
सावंतवाडी : गोव्यातील कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतात म्हणून सिंधुदुर्गातील तरुण त्या मिळवण्यासाठी मोठी धडपड करतात. यातील काहीजणांना कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळते. पण, काही कंपन्या त्यांना कशा त्रासात घालतात, याचं ताजं उदाहरण गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं उघडकीस आणलंय. एका कंपनीनं सिंधुदुर्गातील दोन तरुण आणि एका तरुणीच्या माध्यमातून गोव्यातील तब्बल ५०० जणांना २ कोटी ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आल्यानंतर खळबळ माजलीये. याप्रकरणी पोलिसांनी सावंतवाडीची सारिका पिळणकर, दिगंबर भट आणि सुभाष धुरी यांना अटक केलीये.










