
सिंधुदुर्ग : आरती मासिक व चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्था सावंतवाडीत दरवर्षी निमंत्रितांच्या विभागीय कवयित्री संमेलनाचे आयोजन करते. यावर्षी हे संमेलन ३१ जानेवारी रोजी होत असून यानिमित्त आरती मासिकाने सिंधुदुर्ग-गोवा मर्यादित नवोदित कवयित्री काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत १८ वर्षांवरील महिला सहभागी होऊ शकतील. पहिल्या ३ यशस्वी स्पर्धकांना निमंत्रितांसोबत संमेलनामध्ये आपली कविता सादर करण्याची संधी मिळेल. यशस्वी कवितांना 'आरती' मासिकामधुन प्रसिद्धी दिली जाईल. संमेलनात रोख रक्कम, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन यशस्वी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला जाईल.
इच्छुकांनी २० जानेवारीपर्यंत आपल्या फोन नंबरसहीत स्वरचित दोन कविता उषा परब, स्नेहांकुर, सर्वोदय नगर, सावंतवाडी, सिंधुदुर्ग ४१६५१० या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी ९४२३८१८८२८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा, आरती मासिक संपादक प्रभाकर भागवत यांनी केले आहे.










