
वेंगुर्ला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत वेंगुर्ला तालुक्याचा निकाल ९९.७१ टक्के एवढा लागला आहे. वेंगुर्ला तालुक्यातून एकूण ७०७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ७०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यात एकूण १९ शाळा पैकी १७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. यात पाटकर हायस्कुल, परुळे हायस्कुल, शिवाजी हायस्कूल तुळस, वेतोरे हायस्कुल, श्री माऊली विद्यामंदिर रेडी, मठ हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा, टांक हायस्कुल, दाभोली हायस्कुल, केळुस हायस्कुल, न्यू इंग्लिश स्कुल मातोंड, आडेली हायस्कुल, आसोली हायस्कुल, अणसुर पाल हायस्कुल, सिंधुदुर्ग विद्यानिकेतन, मदार तेरेसा स्कुल, मातोश्री पार्वती राऊत विद्यालय रेडी आदी शाळांचा १०० टक्के निकाल लागला.