सावंतवाडी वजराट मार्गे वेंगुर्ला एसटी बस फेरी सुरू करावी | ठाकरे शिवसेनेच्या वतीने माणगी

Edited by: दिपेश परब
Published on: July 04, 2023 17:48 PM
views 290  views

वेंगुर्ला : सावंतवाडी सकाळी १० वाजता सुटणारी सावंतवाडी वजराट मार्गे वेंगुर्ला ही एसटी बस फेरी बंद असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. वेळेत शाळेत व महाविद्यालयात पोचता येत नसल्याने ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तरी ही एसटी बस फेरी तात्काळ सुरू करून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले आगर व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शहरप्रमुख अजित राऊळ, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, शिवसेना पदाधिकारी संजय गावडे, सुमन कामत यांनी आगर व्यवस्थापक यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.