
वेंगुर्ला : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला शहर शिवसेनेच्यावतीने शहरातील पदाधिकारी मेळावा उद्या रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी ठीक ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
येथील स्वामीनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात शहरातील पदाधिकाऱ्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या मेळाव्यात शहरातील सर्व शाखा प्रमुखांचा सन्मान, विशेष कार्यकारी अधिकारी निवड झालेल्यांचा सत्कार, पक्षप्रवेश व इतर मान्यवरांचे मार्गदर्शन असे कार्यक्रम होणार आहेत.
या मेळाव्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सहित शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, महिला जिल्हा संघटक नीता कविटकर, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, जिल्हा संघटक सुनिल डुबळे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मेळाव्याला सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शहरप्रमुख उमेश येरम, युवासेना शहरप्रमुख संतोष परब, महिला शहर संघटक ऍड श्रद्धा बाविस्कर- परब, अल्पसंख्यांक महिला संघटिका शबाना शेख यांनी केले आहे.