वेंगुर्ला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची घेतली भेट

Edited by: दिपेश परब
Published on: August 28, 2023 16:33 PM
views 127  views

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग चे नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या गणेशोत्सवात वेंगुर्ला तालुक्यातील विज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज वितरण कंपनी ला सूचना करण्यात यावी. तसेच गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील विकासात्मक कामे मार्गी लावावीत अशी मागणी केली.

यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, जिल्हा संघटक सुनील डुबळे, उपजिल्हाप्रमुख सुनिल मोरजकर, सचिन देसाई, तालुका संघटक बाळा दळवी, शहर प्रमुख उमेश येरम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.