
वेंगुर्ले : कारिवडे सावंतवाडी येथील सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांनी ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन पराक्रम, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट एअर स्ट्राईक, टेरर अटॅक अश्या आर्मीमधील वेगवेगळ्या ऑपरेशन मध्ये सहभाग घेऊन नेतृत्व केल. तसेच प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला होता. अशा सुभेदार मेजर संजय लक्ष्मण सावंत यांचा रोटरी क्लब ऑफ वेंगुर्लाच्या वतीने प्रेसिडेंटआनंद बोवलेकर यांनी शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
यावेळी संजय सावंत यांनी आपल्या मिलिटरी मधील ३३ वर्षाचा अनुभव सांगितला. रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिड टाऊन चे प्रेसिडेंट आनंद बोवलेकर व डीस्ट्रिक सेक्रेटरी राजेश घाटवळ यांच्यासहित रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.