BIG BREAKING | वेंगुर्ला खरेदी - विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

मनिष दळवी -एम. के. गावडे यांची यशस्वी शिष्टाई
Edited by: दिपेश परब
Published on: November 17, 2022 16:44 PM
views 679  views

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेत एकूण १५ जागांसाठी फक्त आज अंतिम तारीख दुपारी ३ वाजेपर्यंत १५ च अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी व माजी चेअरमन एम. के. गावडे यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे सर्वपक्षीय एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश आहे आहे. 

   दरम्यान सावंतवाडी व मालवण याठिकाणी खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रतिष्ठतेची झाल्यानंतर  मात्र वेंगुर्ला तालुक्यात ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. सहकारी संस्था मतदार संघातून ज्ञानेश्वर शांताराम केळजी (मातोंड), चित्रा मोहन कनयाळकर (रेडी), विष्णु विठ्ठल फणसेकर (कोचरे), दत्तात्रय भास्कर वजराठकर (वजराठ), गुरुनाथ गजानन मडवळ (म्हापण), प्रकाश महादेव गडेकर (आडेली), मनिष प्रकाश दळवी (होडावडा), व्यक्तिगत मतदार संघातून यशवंत लक्ष्मण परब (वेंगुर्ला), विजय महादेव रेडकर (तुळस), महादेव भालचंद्र गावडे (अणसुर), महिला राखीव मधून सुजाता संदीप देसाई (आसोली), प्रज्ञा प्रदीप परब (वेंगुर्ला), भटक्या विमुक्त जाती/ जमाती मधून गणेश विष्णु गोसावी (मातोंड), इतर मागास प्रवर्गातून जनार्दन रुक्माकांत कुडाळकर (आडेली), अनुसूचित जाती/जमाती मधून महेश लूमाजी परुळेकर या १५ जणांचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळगावकर यांनी दिली आहे. त्यामळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.