वेंगुर्ला म्हणजे सरस्वतीची भूमी : विशाल परब

वेंगुर्ल्यात भाजप तर्फे समूहगीत गायन स्पर्धा संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2024 10:20 AM
views 189  views

वेंगुर्ला : स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने भाजपा वेंगुर्ला आयोजित आणि भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुरस्कृत वेंगुर्ला तालुकास्तरीय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू  देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडळकर, महिला तालुकाध्यक्ष सुजाता पडवळ, वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रमोद कांबळे , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर , महीला मोर्चाच्या श्रेया मयेकर , आकांक्षा परब व रसिका मठकर  आदी मान्यवर उपस्थित होते.

 वेंगुर्ला हायस्कूल वेंगुर्ला येथे भाजपा वेंगुर्ला यांच्यावतीने प्राथमिक गट आणि माध्यमिक गट अशा दोन गटांमध्ये तालुकास्तरीय समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेल होत . यामध्ये तालुक्यातील २१ शाळांनी सहभाग घेतला होता . या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना विशाल परब यांनी वेंगुर्ला म्हणजे सरस्वतीची भूमी असून या वेंगुर्ल्यात ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये ज्ञानदान करणारे शिक्षक हे देवाच स्वरूप  असून ते नवी पिढी घडवण्याचे काम करत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे प्रतिपादन केले. यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.सचिन परुळकर यांनी तर आभार प्रसन्न उर्फ बाळू देसाई यांनी मानले.