वेंगुर्ला भाजप तर्फे १५ रोजी तिरंगा पद यात्रा

माजी सैनिकांचा होणार विशेष सन्मान
Edited by: दिपेश परब
Published on: August 13, 2024 10:13 AM
views 116  views

वेंगुर्ला : दरवर्षी १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपला देश ७८ वा स्वातंत्र दिन साजरा करणार आहे. यानिमित्त अगदी शाळा, मार्केट, ऑफिस मध्ये तिरंगा फडकवण्यात येतो. एकूणच सर्व भारतीय उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करतात. तर केंद्र शासनाने २०२२ पासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू केले आहे. यावर्षी या अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे, तर भारतीय जनता पक्षाने ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा २०२४ अभियानाची तिसरी आवृत्ती सुरू केली आहे. ’हर घर तिरंगा’ अभियानाचा महत्त्वाचा हेतू हा लोकांनी त्यांच्या घरावर राष्ट्रध्वज फडकवावा असा आहे.

लोकमानसात जाज्वल देशभक्ती चे स्फुलिंग कायम तेवत रहावे यासाठी भारतीय जनता पार्टी सदैव कटिबध्द आहे,यासाठी  राष्ट्राभिमान जागृत करून वृध्दींगत करण्यासाठी भाजपा वेंगुर्ला च्या वतीने बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला ते तहसिलदार कार्यलय वेंगुर्ला पर्यंत १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता तिरंगा पद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी देशाच्या सीमेवर सेवा देणाऱ्या माजी सैनिकांचा विशेष सन्मान केला जाणार असून या माजी सैनिकांच्या नेतृत्वात ही तिरंगा पद यात्रा निघणार आहे. तरी या तिरंगा पद यात्रेत सर्व देशप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा वतीने " हर घर तिरंगा " अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केले आहे.