मुंबई गोवा महामार्गावर वाहन तपासणी मोहीम

Edited by:
Published on: June 03, 2024 13:08 PM
views 169  views

सिंधुदुर्गनगरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्यात मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहन तपासणी मोहीम राबवली जात आहे. सदर मोहिमेमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणारी मालवाहू वाहने, मुंबई गोवा प्रवासी  वाहतूक करणारी प्रवासी वाहने यांची तपासणी केली जात आहे. प्रवासी वाहनांची वैद्य वाहन परवाना नसणे, परमिट नसणे, वाहनामध्ये आपातकालीन  दरवाज्याच्या मार्गात  अडथळा असणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, प्रथमोपचार पेटी नसणे, वैद्य वाहन बॅच बिल्ला नसणे , वाहनांना परावर्तिका नसणे तसेच विहित गणवेश धारण न करणाऱ्या वाहन चालकांवर  कारवाई करण्यात. आली .तसेच महामार्गावर ठिकठिकाणी 'अल्कोहोल चाचणी मशीन' द्वारे चालकांची  मद्यपानाची तपासणी आली. 

चालकांना मद्यपान करून वाहन न चालवण्याबाबत समुपदेशन करण्यात आले. सदर मोहीम दिनांक ०१/०६/२०२४ व ०२/०६/२०२४ रोजी राबवून.सुमारे  100 पेक्षा अधिक वाहनांची तपासणी करून  त्यामध्ये दोषी आढळलेल्या वाहनांकडून रुपये पावणेदोन लाख इतका दंड वसूल करण्यात आला. सदरची कारवाई ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटर वाहन निरीक्षक ही सचिन पोलादे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक श्री पराग मातोंडकर, श्री अमोल दांडेकर व वाहनचालक श्री संजय केरकर यांच्या पथकाकडून करण्यात आली.