खेडेगावातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांना कायम स्वरूपी बसण्याची व्यवस्था करावी : शब्बीर मणियार

Edited by: भरत केसरकर
Published on: August 21, 2023 13:10 PM
views 192  views

सावंतवाडी : सावंतवाडी शहराच्या बाजारपेठेत सावंतवाडी तालुक्याच्या आजूबाजूचे कुणकेरी, धवडकी, आंबोली, कलंबिस्त, सांगेली, कोलगाव, दापोली, आंबेगाव, मळगाव, इन्सुली, बांदा, मळेवाड, आरोंदा आदी भागातील गरिब शेतकरी व भाजी विक्रेत्या महिला आणी लोक येतात. मात्र, सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी आणी कर्मचारी त्यांना शहरांमध्ये बसू देत नाहीत. त्यांना नाहक त्रास दिला जातोय असं शब्बीर मणियार यांचं म्हणन आहे.

त्यांच्याकडून 40 ते 50 रुपये ची दर दिवसाला पावती करून पैसे घेतले जात आहेत. महागाई एवढी वाढली आहे की सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. ही गरीब लोकं उन्हातानात बसतात. त्यामुळे त्यांची भाजी आणि विक्रीचे साहित्य उन्हात सुकून जाते. या लोकांना त्रास दिला जातोय. मात्र, परप्रांतीय लोकांच्या एकाच व्यक्तीच्या पाच ते सात गाड्या सावंतवाडी लावल्या जातात.

याकडे नगरपालिका ढुंकूनही बघत नाही. नगरपालिकेला याचं देणं घेणं नाही. सावंतवाडी नगरपालिकेने हे गावातून भाजी विक्रेते येतात. त्यांना योग्य ठिकाणी बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनाच्या वतीने नगरपालिकेला जशास तसे उत्तर दिले जाईल. या लोकांची होणारी परवड थांबून बसण्यास जागा उपलब्ध करावी. अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दिला आहे. याबाबत नगरपालिकेने लवकरात लवकर या खेडेगावातून येणारा गावठी भाजी व इतर साहित्य विक्रेत्यांसाठी जागेची व्यवस्था गणेशचतुर्थी पुर्वी करून द्यावी अशी मागणी  उपजिल्हा संघटक उद्धव ठाकरे सेनेचे शब्बीर मणियार यांनी केली आहे.