
सावंतवाडी : काश्मीर पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने सावंतवाडी गांधी चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता. यावेळी गांधी चौक परिसरात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर फेकला होता. आज सकाळी तो पाकिस्तानचा ध्वज सावंतवाडी शहरातील एका विशिष्ट समाजच्या भाजीविक्रेत्यांने रस्त्यावरून उचलून आपल्या दुकानात नेऊन ठेवला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हा सर्व प्रकार हिंदू समाजातील संघटनाना लक्षात येताच हिंदू संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्या भाजीविक्रेत्याला जाब विचारत चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत पुढील कारवाई पोलीस प्रशासन करत आहे. भाजी मंडईमध्ये देखील काही विशिष्ट समाजाचे भाजी विक्रेते गावातून येणाऱ्या गावठी भाजी विक्री करणाऱ्या ज्येष्ठ महिलांना देखील दादागिरी करत असल्याच्या तक्रारी यावेळी हिंदू बांधवाकडे करण्यात आल्या. अशीच दादागिरी करणाऱ्या त्या भाजी विक्रेत्याला देखील जाब विचारला आणि अनधिकृत जागेवर बसायचं नाही. हिंदू महिला भगिनींना दादागिरी करायची नाही असा दम भरत त्या विक्रेत्याला देखील उठवले. असेच काही भाजी विक्रेते दुकानाची आपली जागा आहे असं सांगत जागा अडवून ठेवून दादागिरी करत होते. यावर देखील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलवून अनधिकृत बसणाऱ्यांना उठवलं पाहिजे अशी मागणी यावेळी हिंदू समाजच्या संघटनानांनी केली.
यावेळी सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, कृष्णा धुळपनावर, विश्वास घाग, शुभम हिर्लेकर, लादू रायका, संकल्प धारगळकर, हितेन नाईक, गजानन करमळकर, हेमंत बिरोडकर, सागर गावडे, शिवराज राऊत यासह हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.