कासव संग्रहालयासह वायंगणी आदर्श ग्रा. पं. होण्यासाठी प्रयत्न करणार : सुनिल डुबळे

Edited by: दिपेश परब
Published on: February 27, 2024 12:47 PM
views 248  views

 वेंगुर्ले  :  वायंगणी ग्रामपंचायतही सागरी महामार्गलगतची आहे. त्यामुळे या महामार्गवरून मोठ्या प्रमाणांत देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. कासवाचे गाव म्हणून नावारूपांस आलेल्या या गावांत पर्यटकांना सेवा-सुविधा ग्रामपंचायतीने पुरविण्यासाठी व आदर्श ग्रामपंचायत होण्यासाठी ग्रामपंचायत परीसर सुशोभीकरणास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निधी देऊन प्रोत्साहन द्यावे. यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याची माहिती शिवसनेचे जिल्हा संघटक सुनील डुबळे यांनी वायंगणी ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमात दिली.

महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ अंतर्गत वायंगणी बीच येथे आयेजित केलेल्या कासव महोत्सव वायंगणी २०२४ चे उदघाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे हस्ते झाले. यावेळी कासव संवर्धनामध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्यांना सुहास तोरस्कर, प्रकाश साळगांवकर या कासव मित्रांचे प्रमाणपत्र देऊन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तसेच या दोन्ही कासवमित्र सुहास तोरस्कर व प्रकाश साळगांवकर यांना प्रत्येकी १० हजार रूपये कासव संवर्धनाचे काम उत्कृष्टपणे करणाऱ्या वायंगणी ग्रामपंचायतीस कासव संवर्धनास प्रोत्साहनपर २५ हजार रूपये बक्षिस स्वरूपांत श्री. केसरकर यांनी जाहिर केले होते.या बक्षिस रकमेचे वितरण आज मंगळवारी शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांत सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर, ग्रामसेवक मधुकर नवार, उपसरपंच रविंद्र घोंड, ग्रामपंचायत सदस्य, -कर्मचारी तक कासवमित्र सुहास तोरस्कर, प्रकाश साळगांवर हे उपस्थित होते.

    कासव महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटनदृष्ट्या स्थानिकांचा विकास साधण्यासाठी या भागांत कासव संग्रहालय (म्युझियम) होण्यासाठी सिंधुरत्न योजनेतून ५० लाख रूपयांचा निधीचे काम या भागात होताना जागेची अडचण आल्यास वायंगणी ग्रामपंचायतच्या जागेत ते करण्यात यावे तसेच सिंधुरत्न योजनेमधून निवासन्याहारी योजना ग्रामपंचायतीस चालविण्यासाठी मिळावी अशा दोन महत्वपुर्ण मागण्या वायंगणी सरपंच अवी दुतोंडकर यांनी करत वायंगणी ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत होण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर निधी भरघोस निधी द्यावा. अशी मागणी केली आहे.