निलेश राणेंसाठी विशाल परबांच सिंधुदुर्ग राजाला साकडं !

Edited by: भरत केसरकर
Published on: September 24, 2023 16:58 PM
views 250  views

कुडाळ : "देवा महाराजा,गणपती बाप्पा आमचे लाडके नेते माजी खासदार निलेश राणे हेंका कुडाळ-मालवण मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून दे. सिंधुदुर्गातील जनतेची अशीच चांगली सेवा चाकरी दरवर्षी करून घे".असे साकडे भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी सिंधुदुर्ग राजाला घातले आहे.

सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेत विधीवत पुजा भाजप युवा नेते विशाल परब यांनी केली. विशाल परब यांनी माणगाव खोऱ्यातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांसह सिंधुदुर्ग राजाचे दर्शन घेतले. यावेळी भाजपचे युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, भाजपचे ओरोस मंडळ अधिकारी दादा साईल, नागेश नेमळेकर, राकेश नेमळेकर,नाना बोगार, सचिन धुरी, दिपक काणेकर, सचिन परब, राजवीर पाटील आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.