UPSC त सिंधुदुर्गच्या सुपुत्राचा डंका ; दाभोलीचा वसंत दाभोलकर देशात 76 वा

Edited by: ब्युरो
Published on: May 23, 2023 20:14 PM
views 213  views

वेंगुर्ला : जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेल्या वसंत प्रसाद दाभोलकर या सिंधुदुर्गच्या आणखीन एका सुपुत्राने यू.पी.एस.सी. परीक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वी रँक पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गात टँलेंटचा झेंडा रोवला. जिल्हा परिषद दाभोली शाळा, त्यानंतर वेंगुर्ले हायस्कूल मधून माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्स मधून इंजिनिअरिंग पदवी मिळावीणाऱ्या या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसऱ्या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले. त्याची ही रँक पाहता तो आता आय.ए.एस. अधिकारी होणार हे निश्चित आहे.