यु.पी.एस.सी.परिक्षेत देशात ७६ आ आलेल्या वसंत दाभोलकरचा भाजपाच्या वतीने सत्कार

Edited by: दिपेश परब
Published on: June 13, 2023 19:24 PM
views 87  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावचा विद्यार्थी वसंत दाभोलकर याने जिल्हापरिषद शाळेत शिकुन यु.पी.एस.सी.परिक्षेत संपूर्ण देशातून चक्क ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंट चा झेंडा रोवला. प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषद दाभोली शाळा त्यानंतर वेंगुर्ले हायस्कूल मधुन माध्यमिक शिक्षण व त्यानंतर रत्नागिरीच्या फिनोलेक्स मधुन इंजिनिअरिंगची पदवी मिळवणाऱ्या या ग्रामीण भागातील सुपुत्राने दुसर्‍या प्रयत्नात हे प्रचंड यश मिळवले व आय.ए.एस. अधिकारी बनन्याचे स्वप्न साकार केले. याबद्दल भाजपा च्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण व संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, माजी नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा कार्यकारणी सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार, जेष्ठ नेते बाबा राऊत, युवा मोर्चाचे संदिप पाटील, प्रणव वायंगणकर,  कमलेश करंगूटकर, बुथ प्रमुख देवेंद्र राऊळ व रविंद्र शिरसाठ, सोशल मिडीयाचे ओंकार चव्हाण, हेमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य अवधूत राऊत व शामल मिशाळे, अनु. जाती मोर्चाचे विष्णू दाभोलकर, आनंद नवार, सीताराम मिशाळे, संतोष साळगावकर आदी उपस्थित होते.