
मंडणगड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचीत्यसाधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तालुका मंडणगड यांच्यावतीने तालुक्यात विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमीक शाळा जावळे, जिल्हा परिषद प्राथमीक शाळा आंबवली, बाणकोट उर्दू शाळा येथे सक्षम तु अभियानाचे माध्यमातून विद्यार्थ्यांना वस्तुंचे वाटप करण्यात आले.
याचबरोबर आंबडवे येथे माजी सैनिक व माजी सैनिक पत्नी सन्मान सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील माजी सैनीक व दिवगंत सैनिकांच्या पत्नी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बाणकोट सरपंच नुरल्ला परकार, पोलीस निरिक्षक संजय चव्हाण, मिलिंद धोतरे यांची प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित लाभली सर्व कार्यक्रमाचे नियोजन तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम यांनी केले. कार्यक्रमास महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष साधना बोत्रे, माजी जि.प. सदस्य प्रकाश शिगवण, माजी सभापती भाई पोस्टुरे, नगरसेविका रेश्मा मर्चंडे, भावेश लाखण यांच्यासह पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. उपक्रमाचे पुर्ण तालुक्यातून कौतूक होत आहे.