
कणकवली : शिवसेनेचे उपनेते तथा माजी जि. प. सदस्य संजय आग्रे यांच्या वाढदिवस ४ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजोपयोगी उपक्रम, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
कुडाळ येथील सार्वजनिक सिंधुदुर्ग येथे दशावतारी नाटक, मालवण येथील फातिमा चर्च आश्रम येथे जीवनावश्यक वस्तुंचे वाटप, दत्तमंदिर येथे अभिषेक, देवगड येथील कुणकेश्वर मंदिरात अभिषेक, फणसे-पडवणे येथील विमलेश्वर मंदिरात अभिषेक, वैभववाडी-नाधवडे येथील महादेव मंदिरात अभिषेक, कणकवली-असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात अन्नदान, घोणसरीतील गणेश मंदिरात अभिषेक, फोंडाघाट-गांगोमंदिर येथे अभिषेक, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट संस्थेच्या मुलांच्या प्रशिक्षणासाठी रायफल भेट, कणकवली शहरातील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात अभिषेक, खारेपाटण येथील रवळनाथ मंदिर येथे अ भिषेक होईल. सायंकाळी ४ वा. संजय आग्रे फार्म हाऊस फोंडाघाट येथे संजय आग्रे हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.