
देवगड : श्री गांगेश्वर विठठ्लाईदेवी सेवा संस्था साळशी- परबवाडी यांच्या विद्यमानाने श्री गांगेश्वर विठ्ठलादेवी कुलदेवता मंदिराचा सातवा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार ९ मे रोजी साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त सायंकाळी ४ वाजता श्री सत्यनारायण महापूजा सायंकाळी ६ वाजता स्थानिक भजने रात्री ७ ते ९ महाप्रसाद रात्री १० वाजता बाळकृष्ण मोरे पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ कवठी ता कुडाळ यांचा दशावतारी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण करण्यात येणार आहेत.तरी सर्वांनी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहून या वर्धापन दिनीशोभा वाढवावी असे आवाहन श्री गांगेश्वर विठ्ठलाई देवी मंडळ साळशी परबवाडी,श्री देव सिद्धेश्वर पावणाई इनाम देवस्थान ट्रस्ट साळशी बारा पाच मानकरी यांनी केले आहे.