
सावंतवाडी : उभाबाजार बाल गोपाळ मित्र मंडळाच्या वतीने सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात पाककला स्पर्धा तसेच लहान मुलांचे खेळ दशावतार नाटक आदिचा यात समावेश करण्यात आला आहे.
सावंतवाडी शहरातील उभाबाजार येथे दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याच प्रमाणे यावर्षी ही शिवजयंती निमित्त कार्यक्रम होणार आहेत.यात मंगळवारी 18 फेब्रुवारी ला सायंकाळी पाककला स्पर्धा होणार असून सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यानी कृतिका कोरगावकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच याच दिवशी लहान मुलांसाठी संगीत खुर्ची आदि कार्यक्रम तर बुधवारी सकाळ पासून शिवजयंती चे औचित्य साधून आर्कषक रांगोळी फुलांची सजावट करण्यात येणार आहे.
तर सायंकाळी शेखर शेणई पुरस्कृत ॐकार दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ले परबवाडा आयोजित दशावताराचा नाट्य प्रयोग शिवाजी महाराज पुतळ्या जवळ होणार आहे. हे कार्यक्रम पाहाण्यासाठी जास्तीत जास्त रसिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन यशवंत कोरगावकर यांनी केले आहे.