लोरेत विश्वकर्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रम..!

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: February 04, 2024 09:53 AM
views 155  views

वैभववाडी : श्री भुतोबा श्री विश्वकर्मा मित्र मंडळ लोरे नं२ सुतारवाडीयांच्यावतीने २२फेब्रुवारीला होणा-या विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

दरवर्षी प्रमाणे लोरे नं२ सुतारवाडीत विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात येणार आहे.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी सकाळी ८वा श्री विश्वकर्मा यांच्या फोटोला अभिषेक व पउजन,सकाळी१०वा सत्यनारायण महापूजा, महाआरती, दुपारी १.३०वा महाप्रसाद, सायंकाळी ४वा महीलांसाठी हळदीकुंकू समारंभ, रात्री ८ स्थानिक भजने, रात्री १०.३०वा बुवा दिनेश वागदेकर व बुवा जनार्दन पेडणेकर यांचा २०-२०भजनाचा जंगी सामना होणार आहे.भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.