पडेल सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम

१ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ लाभार्थी ) वितरण तर बक्षिसे व विविध क्षेत्रातीत महिलांचा सन्मान
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 07, 2023 10:45 AM
views 136  views

देवगड : पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण रामदास पोकळे यांच्या संकल्पनेतून जागतिक महिला दिनानिमित्त बुधवार ८ मार्च रोजी पडेल येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पटांगण येथे महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे यांच्या संकल्पनेतून १५ वा वित्त आयोगातून महिला व बालकल्याण योजने अंतर्गत बालस्नेही गाव संकल्पनेतून कन्यारत्नांच्या भविष्य निर्माण निधी योजनेतून १ लाख १० हजार कन्यारत्न पुरस्कार (३४ कन्यारत्न ना) वितरण करण्यात येणार आहे, .

प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हा अधिकारी स्वाती देसाई, पडेल मंडळ अधिकारी रेश्मा कडुलकर, डॉ. अर्चना किरण मराठे (देवगड ), डॉ. पूजा मालपेकर (पडेल ),  आदी उपस्थित राहणार आहेत, .

पडेल गावातील विविध क्षेत्रातील महिला उद्योजक डॉक्टर, वकील,अंगणवाडी सेविका,आशा सेविका,नर्स, पडेल महिला माजी सरपंच /उपसरपंच आदींचा सन्मान करण्यात येणार आहे, .

३ ते ९ शालेय विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धा, बक्षिसे व प्रशस्ती पत्र,  महिलांसाठी होम मिनिस्टर-पैठणी व इतर बक्षिसे व प्रशस्ती पत्र, पाककला स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र,  मुलींसाठी रस्सी खेच स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र,  सर्व महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा-बक्षिसे व प्रशस्ती पत्र, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पडेल गावातील सर्व महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पडेल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी केले आहे.