
वैभववाडी : तालुक्यात दत्त जन्मोत्सवानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विविध गावांमध्ये हा उत्सव साजरा होत आहे. तालुक्यातील सांगुळवाडी दत्त मठ, वैभववाडी दत्त मंदिर,नाधवडे, भुईबावडा,कुसूर गवळवाडी,करुळ याठिकाणी दत्त जन्म उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा केला जाणार आहे.