
वैभववाडी : सांगुळवाडी येथील श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबारात दत्त जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दत्त जयंती उत्सव निमित्त येथे तीन दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. येथील अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने यावर्षीही दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने मठामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.या उत्साहानिमित्त ता.२४,२५ डिसेंबर रोजी पूजापाठ, महाआरती, महाप्रसाद ,संगीत व वारकरी सुस्वर भजनांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी पूजापाठ ,दत्तयाग होमहवन ,आरती ,दुपारी महाप्रसाद ,सायंकाळी दत्त जन्म व्याख्यान ,दत्त जन्मोत्सव , महाआरती, पालखी मिरवणूक आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
तसेच रात्री स्वरधारा भजन मंडळ तांबोळी , सावंतवाडी बुवा अमित तांबोळकर यांचे सुस्वर भजन होणार आहे. त्याचबरोबर १ जानेवारी रोजी श्री अंबरनाथ राणे महाराज यांची ६६वी पुण्यतिथी साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने या मठात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पूजापाठ ,पालखी सोहळा, महाआरती महाप्रसाद ,पालखी मिरवणूक, आदी कार्यक्रम या दिवशी होणार आहेत. तसेच रात्री बुवा कु. दीपा कुळये विरुद्ध साची मुळंम यांचा २०-२० डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. तरी या दोन्ही कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.