डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 02, 2025 18:23 PM
views 92  views

सिंधुदुर्गनगरी : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती कार्यक्रम १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता  सामाजिक न्यायभवन हॉल सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त दुपारी ३ वाजता विचार मंच सिंधुदुर्गचे अध्यक्ष बी एल कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी त्रिसरण पंचशील, बुद्ध वंदना व भीम वंदना होणार आहे. यावेळी उपासक सहदेव कदम यांची उपस्थिती असणार आहे. दुपारी ३.३० वाजता सभेचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी एल कदम तर प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट रोडे  साहेब उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४.३० वाजता लहान मुलांचे विविध गुणदर्शन पर कार्यक्रम तसेच भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर कविता सादर करण्यासाठी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्या कवींना यामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी ६ एप्रिल २०२५ पर्यंत आपली नावे नोंदवावी. तसेच या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन विचार मंचाचे अध्यक्ष बी एल कदम, व  सचिव आर टी कदम यांनी केले आहे.