वैभववाडीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 11, 2024 13:42 PM
views 101  views

वैभववाडी : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई ग्रामीण,व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व संस्कृतिक भवन वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ११ वाजता धम्मध्वज रोहन व बुद्ध पूजा पाठ संघाचे सर्व बौद्धाचार्य यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.  दुपारी १२ ते १ वाजता धम्म प्रवचन,  विश्वरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती कशी गतिमान करावी.  या विषयावर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक विजय हरकुलकर मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तालुक्यातील दहावी बारावी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मान्यवरांचे सत्कार,स्नेहभोजन.  धम्म गीत गायनाने या कार्यक्रमाचा समारोप होईल.  या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व धम्म बंधू-भगिनीने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव,शारदा कांबळे, सचिव रवींद्र पवार , रुचिता कदम,  कार्याध्यक्ष सुभाष कांबळे, मोहिनी कांबळे, यांनी केले आहे.