
कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली भाजप ऑफिस समोरील कणकवली पर्यटन महोत्सवच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने इंडियन आयडॉलच्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी होणार आहे. या सोबत 19 ते 21 फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी सूक्ष्म, लघु व मध्यम या केंद्रीय उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजनांचे स्टॉल देखील लावले जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात असून या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कणकवली भाजप ऑफिस समोरील कणकवली पर्यटन महोत्सव च्या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने इंडियन आयडॉलच्या सुप्रसिद्ध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा देखील या ठिकाणी होणार आहे. या सोबत 19 ते 21 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी सूक्ष्म, लघु व मध्यम या केंद्रीय उद्योग मंत्रालयातर्फे विविध योजनांचे स्टॉल देखील लावले जाणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबवले जात असून या उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.