
वेंगुर्ला : शिवप्रेमी मित्रमंडळ आरवली टांकच्यावतीने बुधवारी 14 मे रोजी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पुढीलप्रमाणे कार्यक्रम होतील
सकाळी 8 वाजता छत्रपती संभाजी महाराज मूर्ती पूजन, 10 वाजता सत्यनारायण महापूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायं. 7 वाजता ग्रामस्थ भजन, रात्री 9 वाजता नाईक मोचेमाडकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ यांचा नाट्यप्रयोग 'दक्षयज्ञ'.
हे कार्यक्रम मारुती मंदिर टांक इथं होणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क 7588958080. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.