
सावंतवाडी : येथील जयभीम युवक कला-क्रीडा मंडळ आणि महिला बचतगट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ११ मे रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे.
या निमित्त सकाळी ९.३० वाजता प्रतिमा पूजन, त्रिसरण पंचशील, १० वाजता मुलांची भाषणे, त्यानंतर विविध स्पर्धा, महिलांसाठी स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा, रात्री आठ वाजता प्रसिद्ध गायक अमित तांबुळकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम तसेच १० वाजता कलांकुर ग्रुप (तेंडोली आंबेडकर नगर) प्रस्तुत 'दादरा' ही एकांकिका सादर होणार आहे.