
दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील श्री दादासाई मंदिर मठात श्री साईबाबा यांची प्राणप्रतिष्ठा दिन व मंदिर मठाचे मठाधिपती श्री दादासाईंचा वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून करण्यात येणार आहे.
यानिमित्त सकाळी श्रींच्या काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर भजन, प्रवचन, कीर्तन, दिंडी, फुगडी, नामस्मरण आदी कार्यक्रम होणार आहेत तरी या कार्यक्रमांचा लाभ सर्व साईभक्तांनी घ्यावा असे आवाहन मठाधिपती दादासाई यांनी केले आहे.