LIVE UPDATES

देवगड-जामसंडेत शिवराज्याभिषेक दिनी विविध कार्यक्रम

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 25, 2026 12:46 PM
views 17  views

देवगड : सकल हिंदू समाज, देवगड-जामसंडे यांच्यावतीने हिंदू साम्राज्य दिन अर्थात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता इंद्रप्रस्थ हॉल, देवगड येथे होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या गौरवशाली ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून हिंदवी स्वराज्याचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे स्मरण, महाआरती तसेच राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमान जागविणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास देवगड-जामसंडे परिसरातील नागरिकांनी व शिवप्रेमींनी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.