
सिंधुदुर्ग : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या B.SC. IT विभागाचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जयवंती बाबू फाउंडेशन संचलित मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे.
या कॉलेजने प्रथमच २०२३ साली B.Sc. IT हा विभाग चालू केला होता. आज तृतीय वर्ष 2026चा अंतिम वर्षाचा निकाल 100टक्के इतका लागला. विभागातून कैफ इम्तियाज मेमन यांने 9.70 पॉइंटर गुण मिळवून प्रथम, वेदांत विष्णु परब ह्याने 9.52 पॉइंटर गुण मिळवून द्वितीय, तर यशस्वी हनुमंत दळवी हिने 9.18 पॉइंटर गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे विश्वस्त व प्राचार्य विशाल कुशे यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.












