आंबेडकर जयंतीनिमित्त आंबडवेत विविध कार्यक्रम

Edited by:
Published on: April 13, 2025 14:17 PM
views 110  views

मंडणगड :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय रत्नागिरी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ (रजि.) मुंबई आंबडवे यांच्या विद्यमाने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे 13 व 14 एप्रिल 2025 रोजी विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यानिमीत्ताने विविध कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहेत. सभाध्यक्ष म्हणून बाबासाहेबांचे नातू आनंदराज आंबेडकर यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पालकमंत्री, उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्य, महसूल मंत्री योगेश कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास जगदीश ओहोळ प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. (13) एप्रिल रोजी अपरांन्त साहित्य कला प्रबोधिनीचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजीत करण्यात आले याचबरोबर पहीलीपासून खल्या गटासाठी वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,  आयोजीत करण्यात आल्या आहेत. (14) एप्रिल रोजी मान्यवरांच्या उपस्थितीतील जाहीर कार्यक्रमासह सकाळी रँली, झेंडावंदन, धम्मवंदना स्वागत समारंभ व रात्री  प्रबोधनपर कव्वालीचा कार्यक्रमही आय़ोजीत करण्यात आला आहे. तालुकावासीयांनी सर्व कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळ (रजि.) मुंबई आंबडवे ग्रामस्थांचेवतीने करण्यात आले आहे.