
वैभववाडी : नाधवडे येथील शंकर प्रासादिक सेवा मंडळांच्यावतीने महादेव मंदिरात उद्या (ता.२५) मंगळवारपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नाधवडे येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.याही वर्षी तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.उद्या ता.२५पासून याला प्रारंभ होत आहे.पहील्या दिवशी(ता.२५) सकाळी ८ते ११ वाजता लघुरुद्र व आरती सकाळी ११ वाजता ग्रामस्थांसह पालखींचे आगमन, सायंकाळी ३ते ५ संगीत भजने,रात्री १० वाजता चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ प्रस्तुत जलवा २०२५, दुसऱ्या दिवशी (ता.२६) सकाळी ९ ते १२ श्री चरणी इच्छुकांचा अभिषेक, सायंकाळी ३ ते ५ संगीत भजने, रात्री १० वाजता गावातील शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि तिस-या दिवशी (ता. २७) सकाळी १०. ३० वा ग्रामदैवतांसहीत श्रींचे शाही स्नान, दुपारी १२ ते २ वा.महाप्रसाद सायंकाळी ते ३ ते ५ यावेळेस संगीत भजने, रात्री १० वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या तिन्ही दिवशी दुपारी १ वा.वाजता व सायंकाळी ७ वाजता महाआरती , रात्री ८. ३० वाजता पालखी प्रदक्षिणा होणार आहे.भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकर प्रसादिक सेवा मंडळाने केले आहे.