
कुडाळ : कोकणरत्न आणि माजी थोर संसदपटू बॅ. नाथ पै यांच्या ५५ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, कुडाळ येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय शालेय व महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमा, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि गट
ही स्पर्धा दोन गटांत पार पडणार आहे:
१. शालेय गट: इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी.
२. महाविद्यालयीन गट: पदवी व पदविका अभ्यासक्रमातील विद्यार्थी.
प्रत्येक शाळा किंवा महाविद्यालयातून जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. स्पर्धा केवळ मराठी माध्यमातून होणार असून, सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि प्राचार्यांच्या स्वाक्षरीचे शिफारस पत्र असणे अनिवार्य आहे.
आकर्षक पारितोषिके
महाविद्यालयीन गट: प्रथम ५००० रु., द्वितीय ४००० रु., तृतीय ३००० रु. आणि दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी १००० रु. (सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र).
शालेय गट: प्रथम ४००० रु., द्वितीय ३००० रु., तृतीय २००० रु. आणि दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी १००० रु. (सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र).
स्पर्धेचे विषय
स्पर्धकांसाठी सामाजिक आणि चालू घडामोडींवर आधारित विषय ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 'AI - तरुणाईला शाप की वरदान?', 'सोशल मीडियामुळे घडणारी पिढी', 'आजच्या काळात बॅ. नाथ पै यांची गरज' आणि 'युवक आत्महत्या' यांसारख्या गंभीर विषयांवर स्पर्धकांना आपले विचार मांडता येतील.
वेळ आणि नाव नोंदणी
स्पर्धा दिनांक: १७ जानेवारी २०२६, सकाळी १०:०० वाजता.
ठिकाण: बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, कुडाळ.
नाव नोंदणीची अंतिम मुदत: १६ जानेवारी २०२६.
बक्षीस वितरण: १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पुण्यतिथी कार्यक्रमात.
स्पर्धकांसाठी चहा आणि दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून केली जाणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उमेश गाळवणकर यांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
प्रा. अरुण मर्गज (९४२३३०२८५९), प्रा. परेश धावडे (९४२०८२२८७८), प्रा. शांभवी आजगांवकर (९४२२५३५६९३).










