
सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग मार्फत इयत्ता पाचवी च्या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्यात निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर आयोजित केली आहे.
परीक्षेचा पेपर क्रमांक १ : भाषा व गणित सकाळी ११ ते दुपारी १२.३० ,पेपर क्रमांक २ : इंग्रजी व बुद्धिमत्ता दुपारी १.३० ते 3 पर्यंत पेपर होतील. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी सर्व पेपर तपासणी करून गुणनिश्चिती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील टॉप १० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरावर गौरवित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर यांनी सांगितले आहे.










