
सिधुदुर्गनगरी : अपघात होऊ नयेत, यासाठी बंद करण्यात आलेला झाराप येथील मिडल कट अपघातांचे कारण ठरतआहे . तरी झाराप येथे सर्कल व्हावे. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून झाराप ग्रामस्तानी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे .या मागणीची दखल न घेतल्यास येत्या २६जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा झाराप पंचकोशी ग्रामस्थांनी दिला आहे.
सिधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची आज झाराप ग्रामस्थांच्या वतीने भेट घेऊन निवेदन सादर करत चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत परंपरागत चालु असणारा माणगाव खोऱ्यातुन वेंगुर्ला तालुक्याशी झाराप तिठ्यामार्फत जोडणारा मिडल कट बंद केल्यामुळे लोकांची आणि वाहन धारकांची मोठी गैरसोय होत आहे .तरी झाराप तिठा येथे सर्कल करून मधोमध शिवस्मारक उभारावे,जो पर्यत ते होत नाही तोपर्यंत मिडल कट पूर्ववत चालु करून वाहनांच्या वेगमर्यादेला आळा घालण्यासाठी हायवेच्या दोन्ही बाजूला रम्बलर टाकावेत. तसेंच हायवेच्या दोन्ही बाजूला हायवे प्राधिकणाच्या नियमाप्रमाणे सर्व्हिस रोडवर गटार करावेत. झाराप झिरो पॉईंट येथे फ्लाय ओव्हर ब्रिज खाली अपघात होंण्याची शक्यता असल्याने तिथे सिग्नल उभारण्यात यावेत.
या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना झाराप ग्रामस्थांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती निधनानंतर उसळलेल्या जनआंदोलनामुळे माणगाव खोरे आणि वेंगुर्ला तालुक्याला जोडणारा झाराप तिठ्यावरील मिडल कट बंद करण्यात आला खरा पण माणगाव मधून येणारी वाहने विरुद्ध बाजूने वाहन चालवत कुडाळ च्या दिशेने जात असल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असून पादचाऱ्यांच्या जीवाला देखिल धोका निर्माण होत आहे. हायवे प्राधिकरण कडून दोन्ही बाजूला नियमाप्रमाणे जमिन हस्तातरीत केली गेली तरी दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड आणि गटार का केले जात नाही ? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला .पंचक्रोशीतील साळगाव हायस्कुल ला जाणारे विद्यार्थी याच मार्गाने पायी जात असल्याने मुलांच्या जीवाला धोका निर्माण होवून अपघात झाल्यास जबाबदार कोण?
हायवे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे .झाराप झिरो पॉइंट येथे फ्लाय ओव्हर खाली अपघात टाळण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसवण्यात यावी, झाराप तिठा येथील जागा संपादित करून संबधित बाधित इमारतींचा मोबदला दिलेला असताना तिथे नविन इमारतींचे बांधकाम होत असल्याचे दिसून येत आहे . त्यांना अभय कोणाचा? असा प्रश्नही यावेळी ग्रामस्थांमधून उपस्थित करण्यात आला .यावर २६ जानेवारी पर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यास उपोषण आणि त्यानंतर तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा रुपेश बिडये यांच्यासह ग्रामस्तानी दिला आहे .










