विद्यार्थीनींनी साकारली स्त्रीयांची विविध रूपे !

बांदा केंद्र शाळेत महिला दिनी स्तुत्य उपक्रम
Edited by: प्रतिनिधी
Published on: March 08, 2023 20:04 PM
views 257  views

बांदा : येथील जिल्हा परिषद बांदा नं. १ केंद्रशाळेत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थीनींनी विविध प्रकारची स्त्रीयांची रूपे साकारून हा दिवस मोठया उत्साहात साजरा केला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नारीशक्ती गीतगायन केले व शाळेतील महिला शिक्षिकांच्या वतीने केक कापून  महिला दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थीनींनी  पोलीस, शिक्षिका, भाजीवाली, डाॅक्टर, नर्स, सिनेकलाकार, महिला शेतकरी, मासेवाली असे विविध व्यावसायिक, क्रिकेट, बॅटमिंटन, बाॅक्सिंग अशा प्रकारच्या विविध महिला खेळाडू, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अंतराळवीर कल्पना चावला अशा थोर महिला तसेच जिल्हाधिकारी, भारतमाता  त्याचबरोबर गुजराती, राजस्थानी अशा विविध प्रांतिक प्रकारच्या लक्षवेधी वेशभूषा विद्यार्थिनींनी साकारलेल्या. तसेच विद्यार्थिनींनी आपण सादर केलेल्या वेशभूषेच्या भुमिकीचे सादरीकरणही केले.

विशेष म्हणजे यावेळी शाळेतील महिला शिक्षिकांनीही व्यावसायिक व खेळाडूंच्या लक्षवेधी वेशभूषा साकारल्या होत्या.

मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, उर्मिला मोर्ये यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाविषयी माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे. डी. पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रसिका मालवणकर, जागृती धुरी, शुभेच्छा सावंत, वंदना शितोळे, प्राजक्ता पाटील, शितल गवस,  रंगनाथ परब, प्रशांत पवार, गोपाळ साबळे यांनी प्रयत्न  केले.