किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जानेवारी रोजी विविध कार्यक्रम

लघुरुद्र,अभिषेक, आरती, महाप्रसाद व अन्नदान यांचा समावेश
Edited by: संदीप देसाई
Published on: January 06, 2023 10:12 AM
views 121  views

कणकवली : सिंधुरत्न योजना समितीचे सदस्य तसेच समृद्धी फाऊंडेशनचे प्रेरणास्थान किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त ७ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. यामध्ये येथील राममंदिरामध्ये सामंत यांच्या दिर्घायुष्यासाठी सकाळी १०.३० वा. लघुरुद्र,अभिषेक तसेच दुपारी १२.३० वा. आरती व महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. तर याचदिवशी आनंदाश्रम पणदूर, संविताश्रम अणाव व दिविजा वृद्धाश्रम असलदे येथे फळ तसेच एक दिवसाचे भोजन अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी यात सहभागी व्हावे व कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन समृद्धी फाऊंडेशनचे सुनील पारकर, एम. एम. सावंत व शेखर राणे यांनी केले आहे.