
सिंधुदुर्ग : रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस उद्या होणार आहे. यानिमित्त वाढदिवसा दिवशी विविध विकास कामांचे उद्घाटन - भूमिपूजन होणार आहेत.
१)कासार्डे ता. कणकवली येथे नविन प्रा. आ. केंद्र इमारत बांधणे. 2)फणसगांव ता. देवगड येथे प्रा. आ. केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधणे. 3)वैभववाडी येथे बीपीएचयु युनिट बांधणे. 4)तालुका देवगड येथे बीपीएचयु युनिट बांधणे. 5)घावनळे, ता. कुडाळ येथे उपकेंद्र इमारत बांधकाम करणे 6)कडावल ता. कुडाळ येथे नविन प्रा. आ. केंद्र व कर्मचारी निवासस्थान बांधणे. 7) कणकवली येथे बीपीएचयु युनिट बांधणे. 8) सावंतवाडी येथे बीपीएचयु युनिट बांधणे. 9) दोडामार्ग येथे बीपीएचयु युनिट बांधणे.
या कामांचे लोकार्पण/भूमिपूजन गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शरद कृषी भवन ओरोस येथून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे या कार्यक्रमाला खासदार नारायण राणे साहेब, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रम स्थळी तेथील स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे तसेच या कार्यकमानंतर सायंकाळी 5:30 वाजता खासदार साहेबांचा वाढदिवस संपन्न होणार असून खासदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण कार्यक्रमही या ठिकाणी होणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक यांनी खासदार नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आहे