जलजीवन मिशन अंतर्गत विविध स्पर्धा

Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 19, 2023 15:09 PM
views 317  views

सिंधुदुर्गनगरी : जलजीवन मिशन अंतर्गत प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरीता जिल्हास्तरीय चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धाकरीता रक्कम रुपये 2 लक्ष 25 हजारची बक्षिस जाहिर करण्यात आली आहेत. या स्पर्धामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यामिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

जलजीवन मिशनच्या प्रभावी प्रचार प्रसिध्दी करीता जिल्हास्तरीत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने करण्यात आले आहे.  यामध्ये प्राथमिक व माध्यमिक गटामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेसाठी प्राथमिक स्तरावर इयत्ता 1 ते 7  व माध्यमिक स्तरावर इयत्ता 8 ते 10 या वर्गातील विद्यार्थी यांना सहभागी होता येणार असुन दोन्ही गटातील निबंधाची शब्द मर्यादा 1500 इतकी असेल व निबंध लेखन स्पर्धेकरीता वेळ 40 मिनिटांचा असणार आहे.
         
निबंध स्पर्धेकरीता दोन्ही गटा करीता 1.पाऊस पाणी संकलन, 2.पाणी आडवा पाणी जिरवा, 3. जल हेच जीवन, 4.माझ्या गावातील पाणी पुरवठा, 5.जल जीवन मिशन व माझ्या गावचा विकास, 6. जल संवर्धन काळाची गरज हे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेतील विजेत्या दोन्ही गटा करीता प्रथम, व्दितिय, तृतित क्रमांकाना अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-, 5500/- व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. जिल्हास्तरीत चित्रकला स्पर्धा प्राथमिक व माध्यमिक गटा होणार असुन स्पर्धेकरीता प्राथमिक स्तरावर इयत्ता १ ते ७ व माध्यमिक स्तरावर इयता ८ ते १० या वर्गातील विद्यार्थी यांना सहभागी होता येणार आहे. या स्पर्धेकरीता १. पाऊस पाणी संकलन, २. पाणी आडवा पाणी जिरवा, ३. जल हेच जीवन, ४. माझ्या गावातील पाणी पुरवठा, ५. जल संवर्धन व पाण्याचे महत्त्व, ६. पाण्याचे वितरण करप्रणाली,  ७. पाणी पुरवठा योजनेतील लोकसहभाग, ८. पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती.  हे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेतील विजेत्या दोन्ही गटा करीता प्रथम, व्दितिय, तृतित क्रमांकाना अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा ज्युनिअर ( 11 वी व 12 वी) व सिनियर (13 वी ते 15 वी) या दोन गटात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता  १. पाऊस पाणी संकलन, २. पाणी आडवा पाणी जिरवा, ३. जल हेच जीवन, ४. माझ्या गावातील पाणी पुरवठा, ५.  पाण्याच्या स्त्रोताचे बळकटिकरण,  ६. जलसंवर्धन,  ७. पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती हे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेतील विजेत्या दोन्ही गटा करीता प्रथम, व्दितिय, तृतित क्रमांकाना अनुक्रमे रक्कम रुपये 21000/-, 11000/-,5500/- व सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धाचे आयोजन हे शालेय स्तरावर करण्यात येणार असुन शालेय स्तरावर दोन्ही गटात प्रथम, व्दितिय, तृतित क्रमांक येणा-या विद्यार्थ्याचे चित्र व निबंध शाळेने गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्याकडे पाठवावयाचे आहेत. यातुन तालुकास्तरीय निकाल तयार करण्यात येणार असुन तालुक्यात प्रथम, व्दितिय, तृतित क्रमांक पटकावणा-या विद्यार्थ्याचे मुल्यांकन जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे.  तर वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन तालुकास्तरावर करण्यात येणार असुन तालुकास्तरावरीय प्रथम, व्दितिय, तृतित क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांची स्पर्धा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. अधिक माहिती करीता आपल्या पंचायत समिती कार्यालय गट शिक्षणाधिकारी, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) येथे संपर्क साधावा. जिल्हास्तरीत चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयिन विद्यार्थ्यानी सहभाग घ्यावा असे आवाहन  मुख्य कार्यकारी आधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.