
दोडामार्ग : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग तालुक्यात शिवसेनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. तसेच संजू परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली - भेडशी, तळकट आरोग्य केंद्र, मोरगाव आरोग्य केंद्र येथे पंखे वाटप करण्यात आले. तसेच दोडामार्ग इंग्लिश कॉलेज येथे शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, वृक्ष वाटप करण्यात आले. विविध कार्यक्रम करत संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.










