
कणकवली : गावातील तरुनांना उद्योजक बनण्याची संधी मिळावी या हेतूने संस्था कर्ज वाटप करत आहे. याचा फायदा घेत तरुणांनी व्यवसायात वृद्धी करत स्वावलंबी बनावे, असे प्रतिपादन नाटळ सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष एन. बी. सावंत यांनी नाटळ ग्रामपंचायती मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत केले.
नाटळ सहकारी सेवा सोसायटीची सर्वसाधारण सभा बुधवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात झाली. यावेळी प्रगतशील शेतकरी तसेच १० वी, १२ वी मध्ये विशेष प्रविण्य मिळविलेल्या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देत सत्कार करण्यात आला. यावेळी नाटळ सहकारी सेवा सोसायट उपाध्यक्ष तुकाराम नाटळकर, उपसरपंच पंढरीनाथ तायशेटे, गटसचिव गौरव सावंत, संचालक मिलिंद डोंगरे, किशोर परब, दत्ताराम खरात, दीपक पांगम, दशरथ सुतार,प्रतिभा कुडतरकर, चंद्रकांत सुतार, संतोस खरात, सेल्समन राधिका कुडतरकर, प्रगतशील शेतकरी मनोज सावंत, सुभाष घाडीगावकर, विश्वास सावंत, सचिन सावंत, साबाजी सावंत, दयानंद घाडीगावकर, अर्जुन दळवी, सभासद, ग्रामस्थ,विध्यार्थी उपस्थित होते.
सुरुवातीला मयत खातेदार, शहीद जवान, थोर नेते, संशोधक, साहित्यिक, कलावंत, शिक्षक तज्ञ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर नोटीसचे वाचन करण्यात आले. प्रगतशील शेतकरी मनोज सावंत, सुभाष घाडीगावकर, विश्वास सावंत, साबाजी सावंत, दयानंद घाडीगावकर, अर्जुन दळवी तसेच विध्यार्थी प्राची चव्हाण, श्रावणी गुडेकर, विशाखा सांगवेकर, पायल जाधव, पल्लवी आर्डेकर, सलोनी परब, इशांका गोसावी, स्नेहा पवार यांचा सत्कार करण्यात आला.
प्रगतशील शेतकरी मनोज सावंत यांनी आपण कशा पद्धतीने व्यवसायात वृद्धी केली, तरुणांनी व्यवसायात कशी प्रगती करावी याबाबत सविस्तर माहिती दिली. सुभाष घाडीगावकर, विश्वास सावंत, दयानंद घाडीगावकर, अर्जुन दळवी यांनीही मार्गदर्शन केले.