यशवंतराव भोसले स्कूलमध्ये पर्यावरण जागृतीसाठी विविध उपक्रम

Edited by: विनायक गांवस
Published on: June 21, 2024 08:54 AM
views 136  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी 'पर्यावरण वाचवा' या विषयावर घोषवाक्य म्हणत प्रभात फेरी काढली. दुसरी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांनी कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करणे, चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी 'पाणी वाचवा' या विषयावर चित्रे काढणे, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा म्हणणे, तसेच सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी 'वीज वाचवा' या विषयावर भित्तिपत्रक तयार करणे, अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

'कोकणी रानमाणूस' म्हणून प्रसिद्ध असलेले प्रसाद गावडे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडलेल्या गोष्टींचे म्हणजेच वृक्षारोपणाचे महत्त्व, औषधी वनस्पती, मनुष्याच्या जीवनात निसर्गाचे असलेले महत्व याबाबत माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या विविध शंकाचे निरसन करून पर्यावरण संरक्षणाबद्दल त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण केली.