
देवगड : जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमात पाणी गुणवत्ततेत विशेष कामगिरी व वरेरी गाव OdF + करण्यासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल वरेरी सरपंच प्रिया गोलतकर यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान पं.स. देवगड पाणी व स्वच्छता विभागाचे समुह समन्वयक विनायक धुरी यांनी केले. वरेरी सरपंच प्रिया प्रफुल्ल गोलटकर यांनी शासनाने दिलेल्या रासायनिक फिल्ड टेस्ट किट द्वारे पाणी नमुने तपासणी तसेच पाणी व स्वच्छतेबाबत विशेष कामगिरी केली असुन जागतिक महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले . यावेळी उपसरपंच सुभाष राणे , मुख्याध्यापक लिलाधर हिंदळेकर ,ग्रामसंघाच्या अध्यक्षा गिता बाक्रे , विनिता परब , ग्रा.प सदस्य विद्याधर सावंत , उमा बाक्रे, गौरी सावंत , अंगणवाडी सेविका शुभांगी धुरी , मदतनिस अक्षता सावंत , गायत्री पाळेकर , प्रफुल्ल गोलतकर , ग्रा.प कर्मचारी सुनिल लाड , साक्षी बावकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिला दिन निमित्त ग्रामसंघाच्या अध्यक्षा गिता बाक्रे व बचत गटाच्या प्रतिनिधी विनिता परब यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार वरेरी शाळेचे मुख्याध्यापक लिलाधर हिंदळेकर यांनी मानले .