कोतवाल गणपत तेली यांचा वरवडे ग्रामस्थांनी केला सत्कार

वरवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे यांचाही सत्कार
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 20, 2022 16:55 PM
views 207  views

कणकवली : कोतवाल गणपत तेली हे सेवानिवृत्त झाल्याने वरवडे ग्रामपंचायत येथे  ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेसाठी तत्पर असलेले व आता सेवानिवृत्त झालेले गणपत तेली यांचा आज गावाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर नवनिर्वाचित वरवडे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत बोंद्रे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित भाजप उपतालुकाध्यक्ष सोनू सावंत, संदीप चव्हाण,अण्णा साटम, सरपंच भाई बांदल, केंद्रप्रमुख श्री मसुरकर, भाई बोंद्रे, संजय पोळ, विजय कोदे, मधुकर परब, धनंजय सावंत, अजिम कुडाळकर, विजय कदम, प्रदीप घाडीगावकर, अमोल बोंद्रे, सिरेल फर्नांडिस, विजय सावंत, सुनील सावंत, हसन खोत्त, महेश कदम, हनीफ शेख, ग्राम विकास अधिकारी पावस्कर वरवडे ग्रामपंचायत सर्व सदस्य वरवडे ग्रामस्थ उपस्थित महिला वर्ग उपस्थित होते.