वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात योगा दिवसाच्या अनोख्या शुभेच्छा..!

Edited by: विनायाक गावस
Published on: June 22, 2023 11:39 AM
views 154  views

सिंधुदुर्ग : २१ जून जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर वराडकर हायस्कूल  व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी अक्षर लेखनाच्या माध्यमातून WORLD YOGA DAY ही अक्षरे साकारत शुभेच्छा दिल्या. यावेळी मैदानावर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक. पर्यवेक्षिका देवयानी गावडे, क्रीडा शिक्षक श्री संजय पेंडुरकर, रामकृष्ण सावंत, किसन हडलगेकर,  महेश भाट,  शिक्षक व विद्यार्थी  उपस्थित होते. समीर चांदरकर व भूषण गावडे यांच्या संकल्पनेतून ही अक्षर कलाकृती साकारली गेली.