'वंदे भारत'चं ढोल ताशांच्या गजरात कणकवलीत दमदार स्वागत

प्रा. मधु दंडवते यांच्या नावाच्या घुमल्या घोषणा
Edited by: उमेश बुचडे
Published on: June 27, 2023 15:41 PM
views 384  views

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून अत्याधुनिक असलेली वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळ येथून व्ही.सी.द्वारे हिरवा झेंडा दाखवला. या गाडीचे कणकवली रेल्वे स्थानकात १ वाजता आगमन होताच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी या गाडीने प्रवास केला यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केला.


ढोल ताशांच्या गजर व बुवा संतोष कानडे यांनी मोदी सरकारच्या विकासकामांची गीते सादर केली.नव्या कोऱ्या रेल्वे गाडीचे उस्फूर्त स्वागत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी उस्फूर्त गर्दी केली होती.  तसेच कणकवली शाळा नंबर दोन च्या वतीने विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत कोकण रेल्वेचा इतिहास सांगत प्राध्यापक मधु दंडवते  यांच्या  आठवणींना उजाळा दिला.

कणकवली येथे स्वागता करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,कणकवली कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर, माजी आ.प्रमोद जठार, बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, विधानसभा अध्यक्ष मनोज रावराणे, तहसीलदार आर.जे.पवार, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, यांच्यासह बहुसंख्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कणकवलीत दाखल झालेल्या वंदे भारत ट्रेनचे उत्स्फूर्त पणे स्वागत करण्यात आले. यावेळी उमेश वाळके व सोहम वाळके यांनी प्राध्यापक मधु दंडवते यांचा विजय असो अशा घोषणा रेल्वे स्टेशन परिसरात दिल्या.