कुणकेश्वर यात्रा उत्सवात आपदा मित्रांची मोलाची कामगिरी

32 महिला व पुरुष आपदा मित्र यांचा टीममध्ये होता समावेश
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 22, 2023 19:34 PM
views 173  views

देवगड : कुणकेश्वर यात्रोत्सवामध्ये येणारे भाविक तिर्थस्नान करण्यासाठी येत असताना त्यांच्याबाबत कोणतीही दुर्घटना घडू नये, याकरीता यावर्षी देवगड पोलीस प्रशासनाने आपदा मित्र यांची मदत घेतल्यामुळे यात्रोत्सवामध्ये समुद्र स्नान काळात कोणतीही दुर्घटना घडली नाही. यामध्ये प्रामुख्याने देवगड तहसिलदार स्वाती देसाई, आपत्कालीन जिल्हाधिकारी कक्ष, पोलीस प्रशासन यांचे 32 महिला व पुरुष आपदा मित्र यांना मार्गदर्शन करण्यात आले.


या यात्रोत्सवामध्ये आपदा मित्र यांनी दिवस रात्र कुणकेश्वर समुद्रकिनारी तत्परतेने व कर्तव्यदक्षतेने सेवा बजावित समुद्रात उतरणा-या भाविकांना योग्य त्या सूचना करुन मार्गदर्शन केले. कोणतीही दुर्घटना होणार नाही यांची दक्षता घेतली. या सर्व आपदा मित्र यांचे अनमोल असे सहकार्य प्रशासनास लाभलेले आहे. त्यामुळे ही यात्रा कोणत्याही अनुचित प्रकार अथवा कोणतीही दुर्घटना न होता शांततेत पार पाडलेल्याने या सर्व आपदा टिमचे विशेष अभिनंदन करण्यात आले.